शिक्षणाचे महत्त्व मराठी निबंध 150 ते 180 शब्दात आणि 10 लाईन शिक्षणाचे महत्त्व निबंध

शिक्षणाचे महत्त्व मराठी निबंध 150 ते 180 शब्दात 

शिक्षण हे आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे आहे. शिक्षणामुळे आपले भविष्य उज्ज्वल बनते. व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो. शिक्षणाने आपल्याला आयुष्यात खूप गोष्टी मिळवता येतात.

शिक्षण घेतल्याने आपली वेगळी ओळख निर्माण होते. आपल्या बुध्दीला योग्य चालना मिळते. शिक्षण व्यक्तीला जीवनात विविध क्षेत्रात करिअर करण्याची संधी निर्माण करून देते. जसे, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, शिक्षक, पायलट इ. शिक्षण घेतल्याने नोकरी बरोबर समाजात मानही मिळतो. त्यामुळे सर्वांनी शिक्षणाचे महत्त्व समजून घ्यायला हवे. शिक्षण हा व्यक्तीचा मुलभूत अधिकार आहे

शिक्षणामुळे आपल्याला ज्ञान मिळते. ज्ञान ही एक अशी संपत्ती आहे, जी कोणी चोरू शकत नाही. ती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. ज्ञान ही एकमेव अशी संपत्ती आहे जी वाटली तरी कमी होत नाही, उलट वाढतच जाते. शिक्षण व्यक्तीला सुसंस्कृत तसेच ज्ञानी बनवते.

आज शिक्षण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक सरकारी योजना राबवल्या जात आहेत. टी.वी., रेडिओ, मोबाईल, वृत्तपत्र इ. माध्यमातून शिक्षणाबद्दल जागरूकता निर्माण केली जात आहे. सर्वांना मोफत प्राथमिक शिक्षण दिले जात आहे. शिक्षण हे जगातल्या कानाकोप-यातील माहिती वेगवेगळ्या प्रसारमाध्यमा‌द्वारे देते.

शिक्षण आपल्याला ज्ञान देण्यासोबत नैतिकता व शिष्टाचार शिकवते. ते समाजाची सेवा आणि उन्नती करण्याची संधी आपल्याला देते. आपला आत्म- विश्वास वाढवते. शिक्षण व्यक्तीला स्वावलंबी बनवते. आपण शिक्षणाचे महत्त्व ओळखून स्वतः बरोबर आपल्या देशाचीही प्रगती करावी.

शिक्षणाचे महत्त्व मराठी निबंध 100 ते 150 शब्दात 

शिक्षण हे आपल्या सर्वाच्या उज्वल भविष्यासाठी अत्यावश्यक आहे. शिक्षणाचा उपयोग करून आयुष्यात आपण खूप काही मिळवू शकतो. शिक्षणाचा स्तर लोकांचा

सामाजिक आणि कौटुंबिक आदर वाढवतो. शिक्षणामुळे स्वतः ची एक वेगळी ओळख निर्माण होते.

शिक्षण हे मोठ-मोठ्या समस्यांना हरवण्याची क्षमता प्रदान करते. शिक्षण आपल्या- ला सकारात्मकतेकडे वळवते, यशाकडे नेते. आजकाल शिक्षणाला सर्वत्र पोहचवण्यासाठी अनेक सरकारी योजना चालवल्या जात आहेत. लोकांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले जाते. टीव्ही, रेडिओ वर्तमानपत्र इ. प्रसारमाध्यमांतून शिक्षणाबद्दल जागरुकता निर्माण केली जात आहे.

आधीच्या काळात शिक्षण खूप महाग होते. परंतु आधुनिक शिक्षण प्रणाली आजच्या युगात शिक्षणात महत्वाची भूमिका बजावत आहे.

मोफत प्राथमिक शिक्षण सर्वांना दिले जात आहे. ज्यामुळे कमी पैसे असतानाही विदयार्थी आपले शिक्षण पूर्ण करू शकतो. याशिवाय गरीब व हुशार विद्यार्थ्यांना शासना- कडून मासिक व वार्षिक स्कॉलरशिप देखील देण्यात येते.

शिक्षण हे व्यक्तीला एक चांगला माणूस बनवते. एक चांगला डॉक्टर, पायलट, इंजिनिअर, शिक्षक इ. शिक्षणच बनवू शकते. आजही जे लोक शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना आपण शिक्षणाचे महत्व पटवून दिले पाहिजे.

शिक्षणाचे महत्त्व – 10 ओळींमध्ये निबंध

शिक्षणाचे महत्त्व - 10 ओळींमध्ये निबंध
शिक्षणाचे महत्त्व – 10 ओळींमध्ये निबंध

1. शिक्षण हे व्यक्तीच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे ज्ञान घेण्याचे साधन आहे.

2. शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत, साक्षर आणि ज्ञानी बनतो.

3. शिक्षणातून व्यक्तीच्या विचारशक्तीचा विकास होतो आणि समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता अधिक वाढते.

4. शिक्षण समाजात समानता आणते आणि आर्थिक प्रगतीसाठी मार्ग उघडते.

5. शिक्षणामुळे नवे कौशल्य आत्मसात करता येतात, ज्यामुळे रोजगाराच्या संधी वाढतात.

6. शिक्षणामुळे सुशिक्षित माणूस समाजात आदर्श नागरिक म्हणून वावरतो.

7. शिक्षण मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करते कारण ते आपले आत्मविश्वास वाढवते.

8. शिक्षण हे व्यक्तिमत्व विकासाचे बुध्दीचा विकासाचे महत्त्वाचे माध्यम आहे.

9. शिक्षणाशिवाय जीवनात प्रगती करणे खूप कठीण असते.

10. शिक्षणामुळे केवळ व्यक्तीच नव्हे तर संपूर्ण देश्याची प्रगती होते.

Leave a Comment