पंतप्रधान स्वनिधी योजना 50000 रुपये कर्ज मिळणार कोणत्याही कागदपत्राशिवाय कसे ते जाणून घ्या!

पंतप्रधान स्वनिधी योजना / PM SVANIDHI SCHEME 2022

पंतप्रधान स्वनिधी योजना 2022 – ही योजना पंतप्रधान मोदीजींनी सुरू केली आहे, गरीब लोकांना स्वावलंबी बनवणे हे या योजनेचे ध्येय आहे. PM स्वनिधी योजना 2022 मध्ये, विविध क्षेत्रातील रस्त्यावर विक्रेते,फळ विक्रेते, इस्त्रीचे काम,न्हावी,चहा विक्रेते इत्यादी छोटे मोठे काम करणाऱ्या लोकांना त्यांचा रोजगार सुरू करण्यासाठी सरकारकडून सुरुवातीला 10,000 रुपयांचे कर्ज दिले जाईल.आणि जसे जसे ते रक्कमेची परतफेड करतील ही रक्कम 50 हजार पर्यंत जाईल. ही योजना स्पेशल क्रेडिट म्हणूनही ओळखली जाते. 1 जून 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पीएम स्वनिधी योजना बद्दल विचार मांडल्यावर ही योजना जाहीर करण्यात आली. पाच हजार कोटींच्या निधीची तरतूद भारत सरकारने या पंतप्रधान स्वनिधी योजनेसाठी केली आहे. पंतप्रधान स्वनिधी योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला online form भरावा लागेल.

👉पंतप्रधान स्वनिधी योजना
अर्ज करण्यासाठी 🖕
👇👇👇👇
👉👉येथे क्लिक करा.
🖕🖕🖕🖕

पंतप्रधान स्वनिधी योजना माहिती मराठीमध्ये 2022

केंद्र सरकारनुसार उमेदवारांना 1 जुलै 2020 पासून पीएम स्वनिधी योजनेचे लाभ मिळणे सुरू होईल. यासाठी छोट्या व्यापाऱ्यांना कोणतेही प्रकारच्या प्रमाणित कागदपत्र दाखवण्याची गरज नाही. याचा लाभ त्यांना सहज मिळणार असून आता सरकार या रकमेवर कोणतेही व्याज घेणार नाही.जर लाभार्थी व्यक्ती कर्ज फेडण्यास सक्षम नसेल तर त्यासाठी शासनाकडून कोणत्याही दंडाची तरतूद नाही.

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचे उद्दिष्ट काय आहे?

कोरोना व्हायरसच्या संसर्ग संपूर्ण देशात झाल्यानंतर आपल्या देशात लॉकडाऊन जाहीर झाला.त्यामुळे रस्त्यावर छोटे छोटे व्यवसाय कामे करून पोट भरणाऱ्या लोकांवर उपवास मारीची वेळ आली.देशात लॉकडाऊन उघडल्या नंतर सुद्धा त्यानां पुन्हा त्यांचा रोजगार / व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी त्या लोकांकडे पैसे नव्हते त्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले.

या लोकांचे प्रॉब्लेम लक्षात घेता भारत सरकारने प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरू केली.या योजनेचा फायदा ग्रामीण व शहरी दोन्ही भागातील लोकांना मिळणार आहे.जे रस्त्यावर छोटे मोठे काम व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत असत.उदा.भाजीपाला विक्रेते,फळ विक्रेते,इत्यादी

स्वनिधी योजना ठळक मुद्दे

योजनेचे नाव पीएम स्वनिधी योजना
योजना कोणी सुरू केली पंतप्रधान नरेंद्र मोदी 
योजना घोषणा 14 मे 2020
लाभार्थी 50 लाखांहून अधिक उमेदवार
उद्देश लोक पुन्हा व्यवसाय सुरू करू शकतात.

पंतप्रधान स्वनिधी योजनेसाठी पात्र उमेदवार

  • भाजी विक्रेता
  • फळ विक्रेता
  • फेरीवाले
  • पुस्तक स्टेशनरी
  • कटिंग दुकाने
  • मोची
  • कपडे धुण्याची दुकाने
  • चहाचे दुकान
  • कारागीर उत्पादने
  • पान दुकान

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचे फायदे

  1. सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे पंतप्रधान स्वनिधी योजनेत, एखाद्या उमेदवाराने सरकारने दिलेल्या मुदतीत कर्ज देता आले नाही तर त्याला कोणत्याही प्रकारचा दंडाची किंवा शिक्षेची तरतूद नाही.
  2. पंतप्रधान स्वनिधी योजनेंतर्गत, कर्जदाराने दर महिन्याला त्याचा मासिक हप्ता वेळेवर भरल्यास, त्यासाठी त्याला कर्जावर 7 टक्के सबसिडी दिली जाईल. आणि ही सबसिडी 6 महिन्यांत त्याचा खात्यात transfer केली जाईल.
  3. पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही उमेदवाराला कोणत्याही कागदपत्र प्रक्रियेतून जावे लागणार नाही.
  4. पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत देशातील 50 लाखांहून अधिक लोकांना कर्जाचा लाभ मिळणार आहे.

प्रधानमंत्री स्वनिधी योजना कर्ज देणाऱ्या संस्था 🏦

  • प्रादेशिक ग्रामीण बँक
  • सहकारी बँक
  • बिगर बँकिंग वित्त कंपन्या
  • स्मॉल फायनान्स बँक
  • मायक्रो फायनान्स संस्था आणि SHG बँका
  • अनुसूचित व्यावसायिक बँक

पंतप्रधान स्वनिधी योजना
अर्ज करण्यासाठी 🖕
👇👇👇👇
👉👉येथे क्लिक करा.
🖕🖕🖕🖕

पीएम स्वनिधी योजना 2023 ऑनलाईन अर्ज कसा करावा?

आजच्या पोस्टमध्ये प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत अर्ज कसा करायचा आहे ते स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत.

  1. सगळ्यात पहिले स्वनिधी योजनेच्या official website ला भेट द्या.
  2. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर Home Page उघडेल, तुम्हाला Apply For Loan लिंकवर क्लिक करावे लागेल.
  3. तुमच्या स्क्रीनवर एक नवीन Page उघडेल, या पेजमध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि तुम्हाला खाली दिलेल्या Captcha code टाकावा लागेल, त्यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक OTP येईल, तो OTP टाकावा लागेल.
  4. यानंतर, तुमच्या समोर एक वेब पेज दिसेल, तुम्हाला या  पेजमध्ये काही पर्याय दिसतील, तुम्हाला तिन्ही पर्याय वाचून View More (अधिक वाचा) वर Click करावे लागेल. तुम्ही View More वर क्लिक करताच तुमची स्क्रीन Form Download होताना दिसेल.
  5. pmsvanidhi.mohua.gov.in या लिंकवर क्लिक करताच तुमच्या स्क्रीनवर स्वनिधी योजनेचे लोनचे page उघडेल.
  6. यानंतर, तुम्ही अर्जातील सर्व तुमची Information भरा आणि विचारलेल्या सर्व कागदपत्रांच्या Photo Copy देखील जोडा. नमूद केलेल्या वित्तीय संस्थांना अर्ज सादर करा.

Leave a Comment